Maharashtra Times·31 ส.ค. लंडनची नोकरी सोडली, ७५ वर्षांनी गावात पाणी आणले; डॅशिंग महिला IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा!
IAS Officer Divya Mittal Resigns: 'अशक्य हे केवळ एक मत आहे, वस्तुस्थिती नाही!' हे मिर्झापूरमध्ये प्रत्यक्षात आणून दाखवणाऱ्या २०१३ बॅचच्या धडाडीच्या आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आयआयटी दिल्ली आणि आयआयएम बंगळुरूचे शिक्षण घेतलेल्या दिव्या यांनी लंडनची करोडोंची कॉर्पोरेट नोकरी सोडून युपीएससी गाठली होती. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे पाण्यासाठी तरसणाऱ्या 'लहुरिया दाह' गावात नळाचे पाणी पोहोचवून त्यांनी इतिहास रचला होता. 'पद गेले तरी स्वप्न कायम आहे' असा भावनिक निरोप त्यांनी दिला आहे.