ለደረጃዎ የተጻፈ እውነተኛ ዜና፣ ከጥያቄዎች ጋር። ከከጀማሪ እስከ ብቃት የተዘጋጁ የማራቲ ዜና ያንብቡ። እያንዳንዱ ትምህርት ሙሉ ጽሑፍ፣ ትርጉምና ጥያቄዎች አሉት። ከታች ደረጃዎን እና ርዕስዎን ይምረጡ።
ትምህርትጀማሪDomestic LPG Gas Cylinder Price : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना एक निर्णय घेऊन मोठा दणका दिला. थेट एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आता मोठी वाढ केली आहे.
ሳይንስና ቴክኖሎጂጀማሪसीएनजीच्या ग्राहकांना मोठा दणका बसला आहे. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
ሳይንስና ቴክኖሎጂመካከለኛPMC Waste Management: दररोज ७५ मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प; सण-उत्सवांच्या काळात रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या सुक्या कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार.
ወደ ጉልምስናከፍተኛ መካከለኛOBC Morcha : अंतरवली सराटीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु असतानाच आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा धडकणार आहे.
ወደ ጉልምስናከፍተኛ መካከለኛसांगली : कामात अनियमितता, हलगर्जीपणा, विनापरवाना गैरहजेरी, आर्थिक गैरव्यवहार यांसह विविध कारणांमुळे जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायत अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. संबंधित प्रकरणांचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे चौकशीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, यातील काही प्रकरणे तब्बल आठ ते नऊ वर्षांपासून प्रलंबित असल्याने चौकशीचा अहवाल आणि त्यानंतर होणारी कारवाई नेमकी कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणांकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष घालून चौकशीला गतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.ग्रामपंचायत अधिकारी हा गावच्या प्रशासकीय यंत्रणेतील महत्त्वाचा घटक आहे. गावातील विकास कामांचे नियोजन, ग्रामपंचायतीच्या निधीचा विनियोग, ग्रामसभा, ठरावांची अंमलबजावणी, विविध अहवाल व पत्रव्यवहार, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर असते. पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी, स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, १५ वा वित्त आयोग, प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट गाव यांसह विविध योजनांचे कामकाजही त्यांना पाहावे लागते.गावाच्या विकासासाठी काही ग्रामपंचायत अधिकारी जबाबदारीने आणि सक्रियपणे काम करत असताना काही ठिकाणी त्यांच्या कामकाजाबाबत तक्रारींचा पाढा वाढत असल्याचे चित्र आहे. आर्थिक गैरव्यवहार, कामात अनियमितता, कर्तव्यात कसूर, विनापरवाना गैरहजेरी यांसारख्या कारणांमुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार ४९ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या चौकशीचे प्रस्ताव विभागीय स्तरावर पाठविण्यात आले आहेत.२०१७ पासूनची प्रकरणे अजूनही प्रलंबितविशेष म्हणजे काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध २०१७ पासूनच विभागीय चौकशीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. आठ ते नऊ वर्षांचा कालावधी उलटूनही या प्रकरणांतील चौकशी अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झालेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणांमध्ये चौकशीची प्रक्रिया नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशीचा प्रस्ताव पाठविला, त्यानंतर अहवालाची प्रतीक्षा आणि अहवाल आल्यानंतर कारवाई, या प्रक्रियेला वर्षानुवर्षे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. दोषी असल्यास कारवाई आणि निर्दोष असल्यास संबंधितांना दिलासा, यापैकी कोणताही निर्णय वेळेत होत नसल्याने प्रकरणे प्रलंबित ठेवण्याचा नेमका फायदा काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.'तारीख पे तारीख'चा कारभार कधी थांबणार?ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी आल्यानंतर चौकशीचा प्रस्ताव पाठविणे ही केवळ प्रक्रियेची सुरुवात आहे. त्यानंतर चौकशी पूर्ण होऊन अहवाल प्राप्त होणे आणि त्यावर अंतिम निर्णय होणे आवश्यक आहे. मात्र, अनेक प्रकरणांत प्रस्ताव पाठवून वर्षानुवर्षे उलटूनही अहवालच प्राप्त होत नसल्याने 'चौकशी पूर्ण होणार कधी आणि कारवाई होणार कधी?' असा सवाल आता उपस्थित होत आहे.
ጤናከፍተኛ መካከለኛसोलापूर : बेरोजगारी, अस्थिर खासगी नोकऱ्या आणि मुलींच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे तरुणांचे लग्न जुळत नाही. त्यातच विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली मॅरेज ब्युरो आणि खासगी व्यक्तींकडून प्रचंड लूट होत आहे. याविरोधात लग्नाळू तरुण १० सप्टेंबरला सोलापुरात जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर शांततेत बसून सरकारचे लक्ष वेधणार आहेत. लग्न योग्य वयात व्हावे, फसवणूक होऊ नये यासाठी शासनाकडे अविवाहित तरुण-तरुणींची अधिकृत नोंद असणे आवश्यक असल्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.आम्ही लग्नाळू युवक येतोय सोलापूर जिल्हा परिषद समोर.. लग्नाळू तरुणांनो, शांततापूर्ण निषेधासाठी एकत्र या... अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आंदोलनाचे प्रमुख किसनदेव ननवरे यांनी सांगितले की, मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सरकारी अथवा स्थिर नोकरी असलेला वर हवा, अशी अपेक्षा केली जात असल्याने बेरोजगार तसेच खासगी नोकरी करणाऱ्या तरुणांना विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे लग्न न होण्याच्या समस्येची नेमकी व्याप्ती समोर आणण्यासाठी शासनाकडे अविवाहित तरुण-तरुणींची अधिकृत नोंद असणे आवश्यक असल्याची मागणी ननवरे यांनी केली. विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली मॅरेज ब्युरो आणि खासगी व्यक्तींकडून अविवाहित तरुणांच्या कुटुंबीयांकडून प्रचंड पैसे उकळत आहेत. याविषयी मागण्यांचे निवेदन पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे यांना देेणार आहेत.आंदोलनकर्त्यांच्या मागण्याजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सर्व धर्मीय अविवाहित तरुण-तरुणींची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुरू करावीसरकारी विवाह नोंदणी पोर्टल निर्माण करावेविवाह इच्छुक तरुणांना पाच लाखांचे पॅकेज द्यावे
Western Railway Timetable Change From September 1: दोन सामान्य लोकल आता वातानुकूलित म्हणून धावणार आहे. तर, दोन विरार लोकलचा बोरिवली थांबा काढण्यात आल्याने बोरिवलीकरांमध्ये नाराजी आहे.
መነሳሳትና ቀልድጀማሪसातारा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राॅड डोक्यात मारून खून केला. या घटनेनंतर मारेकर्यानेच पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली आणि त्याला अटक केली.सुनीता प्रदीप चव्हाण (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. पती प्रदीप हणमंत चव्हाण (३५, दोघे रा. मंगळवार पेठ, समर्थ मंदिर रोड, सातारा) याला अटक केली आहे. या प्रकरणी मृत सुनीता यांचा भाऊ बंडू पवार (रा. कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.ही घटना ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता घडली. सुनीता व प्रदीप यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यातून अनेकदा मारहाणीपर्यंतच्या घटना घडल्या आहेत. प्रदीप हा ट्रक चालक आहे. त्यांना दोन मुली व मुलगा आहे. ३० ऑगस्ट रोजीही पती-पत्नीत वाद झाला. रात्री उशिरा मुले माडीवर व एक आज्जीकडे झोपी गेले. सुनीता झोपेत असताना संशयित प्रदीप याने रॉड काढला. पत्नीच्या डोक्यात त्याने वर्मी घाव टाकताच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.
የዕለት ተዕለት ሕይወትየመጀመሪያ ደረጃPune News: कुणबी नोंद नसलेल्यांच्या एसईबीसी आरक्षणाबाबत विचारला प्रश्न; महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरील फ्लेक्स काढल्याने तीव्र निषेध.
ስፖርትመካከለኛईश्वरपूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ओढणीने गळा आवळून निर्घृण खून केल्यानंतर तिचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मंगेश चंद्रकांत कांबळे (रा. मांगले, ता. शिराळा) असे शिक्षापात्र आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. १) देविदास एच. केळूसकर यांनी हा निकाल दिला. या खटल्यात अवघ्या सहा वर्षांच्या मुलाने स्वतःच्या बापाविरोधात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, मंगेश याने प्रेमविवाह केला होता. तो पनवेल येथे डंपरचालक म्हणून कामाला असताना पत्नी प्राजक्ता (वय ३०), मुलगा शिवम (वय ६) आणि मुलगी शिवण्या (वय ३) यांच्यासह राहत होता. मंगेश पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत भांडत असे. २१ मार्च २०२५ रोजी तो कुटुंबासह मांगले येथील मूळ गावी आला. त्यानंतर २७ मार्च २०२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरी त्याने पुन्हा प्राजक्ताशी वाद घातला. मारहाण करत ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.मुलासमोरच मृतदेह पेटीत ठेवलाखुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मंगेशने मृतदेह शेजारच्या खोलीतील लोखंडी पेटीत ठेवला आणि खोलीला कुलूप लावून पसार झाला. हा सर्व प्रकार सहा वर्षांचा मुलगा शिवम प्रत्यक्ष पाहत होता. शिवमने रडत आत्याला सर्व प्रकार सांगितल्यानंतर हत्येचा बनाव उघडकीस आला. मृत प्राजक्ता यांच्या आई रंजना चांदणे यांनी शिराळा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती.शिराळा पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी रंजना चांदणे, मुलगा शिवम, पंच, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक बनसोडे, डॉ. अनिरूद्ध काकडे, तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.बालविकास अधिकारी स्वाती शिंदे, मावशी वर्षा चांदणे व पोलिसांच्या उपस्थितीत शिवमचा जबाब नोंदवण्यात आला होता. "वडिलांनी आईला मारहाण करून गळा आवळला अन् कपड्याने बांधून मोठ्या डब्यात ठेवले", अशी साक्ष चिमुकल्या शिवमने न्यायालयात दिली. या बालकाची महत्त्वपूर्ण साक्ष या खटल्याचा मुख्य आधार ठरली.न्यायालयाने भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) व २३८ अन्वये मंगेशला दोषी धरत जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. सतीश केकणीस यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शरद जाधव, सुनंदा निकम व पोलिस हवालदार उत्तम शिंदे यांनी सहकार्य केले.
Rapper Badshah Divorce Post रॅपर बाहशाह याच्या वैवाहिक आयुष्यात गोंधळ सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर गायकाने यावर मौन सोडले असून घटस्फोट झाल्याचे कबुल केले आहे.
ፍቅርና ቤተሰብከፍተኛDevendra Fadnavis: भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक वक्तव्य; उत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे पुणेकरांना आवाहन.
ምናባዊ ታሪክየመጀመሪያ ደረጃपिंपोडे बुद्रुक : सातारा-लोणंद मार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. लोणंद बाजूकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारा एक भरधाव ट्रक थेट देऊर येथील एस. टी. बसस्थानकात शिरला. ट्रकच्या धडकेत बसस्थानकासोबत उपहारगृहाचे (कॅन्टीन) नुकसान झाले आहे. दैव बलवत्त म्हणून उपहारगृहात असलेला मुलगा वेळेवर सावध झाल्याने वाचला. मात्र, उपाहारगृह पूर्ण उध्वस्त झाले.सातारा ते लोणंद रस्त्यावरील देऊर ता . कोरेगाव येथील बसस्थानक व त्यासोबत असलेल्या उपहारगृहात सोमवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास भरधाव ट्रक जाऊन धडकला. देऊर येथील सुभाष मांढरे हे येथील उपाहारगृह चालवतात. त्यांचा मुलगा आर्यन पहाटे उपहारगृह सुरू करण्यासाठी गेला. त्याने दरवाजा उघडला साफसफाई करून झाल्यावर काही वेळातच ट्रक भरधाव वेगाने उपहारगृहात घुसला. आर्यनला काय करावे हे सुचले नाही त्यामुळे तो तेथील किचन ओट्यावर उभा राहिला. उभा असलेल्या आर्यन पासून केवळ एक ते दीड फूट अंतरावर ट्रक थांबला होता. भीतीने गाळण उडालेला आर्यन उभ्या असलेल्या ट्रकच्या खालून बाहेर आला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आर्यन या अपघातातून बचावला. ट्रकच्या धडकेत उपहारहागृहासोबत बसस्थानक सुद्धा अर्धे तुटून पडले. दरम्यान समोरून येणाऱ्या कार चालकाच्या चुकीच्या निर्देशामुळे ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
Devendra Fadnavis On Rahul Gandhi: महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याच्या मार्गात अडथळा आणणारे नेमके कोण आहेत, हे जनतेसमोर आले पाहिजे. महिला आरक्षणाचे खरे मारेकरी राहुल गांधी आणि यूपीएतील घटकपक्ष असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
ጓደኝነትጀማሪरत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रक्रियेत जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३१ हजार ५९६ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे प्रारूप यादीतील नाव तपासण्याची जबाबदारी आता मतदारांवर आली असून, नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक धरून ही प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही, तसेच नाव, पत्ता व अन्य तपशील योग्य आहेत का, याची पडताळणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या पदनिर्देशित ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांना ऑनलाईन पद्धतीनेही यादी तपासता येणार आहे.नावे वगळण्यामागे नेमके कारण काय? जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळण्यात आल्याने त्यामागील कारणांकडे आता लक्ष लागले आहे. मृत मतदार, स्थलांतरित मतदार, दुबार नोंदणी किंवा अन्य कारणांमुळे ही नावे वगळण्यात आली असण्याची शक्यता आहे. मात्र, प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्याने संबंधित मतदारांना आपले नाव वगळले गेले आहे का, याची खातरजमा करून त्यावर हरकत घेण्याची संधी मिळणार आहे. तीन नमुन्यांतून दावे-हरकती मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६, नावावर आक्षेप घेण्यासाठी अथवा नाव वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७, तर मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती किंवा पत्ता बदलण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरता येणार आहे.राज्यात १ लाख २१६ केंद्रेविशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत राज्यातील मतदान केंद्रांचेही सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. पूर्वीची १ लाख २५३ मतदान केंद्रांची संख्या आता १ लाख २१६ झाली आहे. यात ३९४ नवीन मतदान केंद्रांची भर पडली, तर मतदारसंख्या कमी झाल्याने ४३१ केंद्रे कमी करण्यात आली. राज्यातील २ कोटी जणांचा समावेश एसआयआर कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. जुन्या मतदार यादीतील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची म्हणजे २१.१४ टक्के नावे ही प्रारूप यादीत वगळली गेली आहेत. वगळण्यात आलेल्या नावांमध्ये सुमारे १७ लाख मतदार दुबार असल्याने त्यांची नावे एकाच ठिकाणी नोंद झाली आहेत. ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादीप्रारूप यादीतील २००२-२००४ च्या मतदार यादीशी जुळवणी न झालेले मतदार तसेच तार्किक विसंगती आढळलेले मतदार यांना संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटिसा बजावण्यात येणार आहेत. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची पडताळणी करून निर्णय घेतला जाणार आहे.
ማኅበረሰብመካከለኛसोलापूर : कॉरिडॉरसाठी पंढरपूर येथे बाधित दुकानदारांना पर्यायी दुकान, बाधित होणाऱ्या ४५० हून अधिक घरांतील नागरिकांना योग्य पर्याय उपलब्ध करून देत नियोजन केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर निवासी संकुल उभे केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. बाधितांसाठी मंदिरापासून सव्वा किलोमीटर अंतरावर एकतीस हजार तीनशे चौरस मीटर इतकी जागा असून, यात २८ हजार चौरस मीटर जागेवर घरे बांधून दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे बाधितांना घर आणि दुकान बांधून पूर्ण होईपर्यंत तीन वर्षे घर आणि दुकानाचे भाडेदेखील राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. त्यासाठी विशेष पुनर्वसन पॅकेजला मान्यता दिल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.पंढरपूरमधील जमीन व मालमत्ता अधिग्रहणासाठी देण्यात येणारा मोबदला हा थेट मुंबईतील दरांच्या धर्तीवर देण्यात आला आहे. पंढरपूरमधील जुनी मंदिरे आणि मठ यांचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवून त्यांचा विकास केला जाणार आहे. कोणतेही मंदिर किंवा मठ स्थलांतरित केले जाणार नाहीत. बाधितांचे योग्य पुनर्वसन करून जागेस जागा देण्याचे शासनाचे धोरण आहे. विकास आराखड्यामुळे बाधित होणारे दुकानदार, रहिवासी आणि इतर व्यावसायिक यांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
መነሳሳትና ቀልድብቃትचिपळूण शहर : शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख व छत्रपती शिवाजी चौक ते पाग पॉवर हाऊस (स्वा. सावरकर चौक) रस्ता रूंदीकरणाच्या प्रक्रियेला चिपळूण न.प. प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार २ सप्टेंबरपासून प्रस्तावित रूंदीकरणामध्ये ताब्यात घेतल्या जाणार्या जागांचे मोजमाप व मूल्यमापन प्रशासनाकडून सुरू केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यासंदर्भात संबंधित जागा मालकांना यापूर्वीच नोटीसांद्वारे सूचीत करण्यात आले आहे.शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांचे रूंदीकरण करण्याबाबत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी निर्णय घेतला. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने प्रामुख्याने शहरातील रस्ते रूंद असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी प्रथम प्रमुख वर्दळीचे रस्ते रूंद करण्यासाठी प्रशासनाकडून परिपूर्ण माहिती व तांत्रिक अहवाल नियोजन तयार करून घेतले. त्यानुसार आवश्यक असणार्या निधीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या महत्त्वाच्या विकासकामांचे प्रस्ताव निधीसाठी दिले. त्याला प्राथमिक स्तरावर संबंधितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली जाणार आहे.यापूर्वी प्राथमिक स्तरावर रस्ता रूंदीकरणाची मोजमापे घेण्यात आली. त्यानुसार दोनवेळा संबंधित जागा मालकांना या बाबत नोटीसा देऊन कल्पना देण्यात आली व बाधीत जागेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच संबंधितांनी रस्ता रूंदीकरणासंदर्भात प्रशासन व न.प.कडून कोणत्या अपेक्षा आहेत, अशा आशयाच्या सूचना मागविण्यात आल्या. आता प्रशासनाकडून रूंदीकरणासाठी कार्यवाहीचे पहिले पाऊल उचलले जाणार आहे. त्यानुसार प्रशासनाने छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख नाका दरम्यानच्या रस्ता रूंदीकरणाला दोन्ही बाजूने आवश्यक जागा रेखांकीत करण्यासाठी संबंधित जागांचे मोजमाप व रेखांकन करण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्याबाबत संबंधित जागा मालकांना प्रशासनाकडून नोटीसा देऊन सूचीत करण्यात आले आहे.
መዝናኛከፍተኛPMC Care: एसआयआरच्या कामाचे कारण पुढे करत महापालिकेकडून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न; १५ क्षेत्रीय कार्यालयांसह ४३ विभागांत तक्रारींचा खच.
ማኅበረሰብብቃትचिपळूण : कोयना अभयारण्यात सोडलेल्या वाघांना कोकणातील निसर्गाची भुरळ पडली आहे. या अभयारण्यात सोडलेली ‘हिरकणी’ तब्बल दोन महिने कोकणातील चिपळूण परिसरात वास्तव्यास होती. अनेकवेळा वन विभागाने तिला पुन्हा कोयना अभयारण्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. अखेर दोन महिन्यांनंतर ती पुन्हा एकदा आपल्या कोयना अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात स्थिरावली. त्यासाठी तिला खास प्रयत्न करून वळवावे लागले. त्यामुळे वाघांना कोकणचा निसर्ग आवडल्याचे अधोरेखित झाले आहे.११६५ चौ.कि.मी. परिसरातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पसरला आहे. सह्यद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येतो. त्यामुळे अनेकवेळा व्याघ्र प्रकल्पातील वाघ कोकणामध्ये येत असतात. आंबा घाटमार्गे, तर कधी कुंभार्ली घाटमार्गे त्यांचा कोकणामध्ये प्रवास घडतो. यावेळी तिने याच भागात शिकार केल्याचेही सांगण्यात येत आहे.कोयना अभयारण्यात सोडलेला नर वाघ ‘एसटीआर 03’ अर्थात बाजी याच्या जोडीला ही ‘हिरकणी’देखील कोयना अभयारण्यात सोडण्यात आली. यानंतर या वाघिणीने कोयना अभयारण्यात आपला वावर सुरू केला आणि कालांतराने ही वाघीण पश्चिमेकडे अर्थात सह्याद्री पर्वत ओलांडून थेट कोकणात आली. कोकणात प्रवेश पेंच व्याघ्र प्रकल्पातून पीटीआर १२३ या क्रमांकाची वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आली. तिला ‘एसटीआर ०६’ हा शासकीय नंबर देण्यात आला, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्यांनी तिला ‘हिरकणी’ हे नाव दिले. तिने नावाप्रमाणेच सह्याद्रीचा कडा ओलांडून कोकणात प्रवेश केला. तब्बल दोन महिने ती चिपळूण तालुक्याचा पूर्व विभाग पादाक्रांत केला.
कोल्हापूर : सप्टेंबर महिन्यात सणांची रेलचेल असतानाच, बँकिंग क्षेत्रातील संभाव्य संपामुळे बँकांचे कामकाज तब्बल ११ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपाचा इशारा दिला असून, हा संप झाल्यास ११ दिवस, तर संप टळल्यास ७ दिवस बँका बंद राहतील, अशी माहिती यूएफबीओचे सुशांत मुळीक यांनी दिली.मंगळवार (दि. १) पासून सुरू होणाऱ्या या महिन्यात ४ रविवार, २ शनिवार आणि सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) गणेश चतुर्थीची १ अशा ७ अधिकृत सुट्ट्या आहेत. याशिवाय संघटनेने ११ सप्टेंबर तसेच २८, २९ व ३० सप्टेंबर या ४ दिवशी संपाचा इशारा दिला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर वेगवेगळ्या राज्यांतील स्थानिक सुट्ट्या (उदा. गुजरातची जन्माष्टमी, केरळचा ओणम) एकत्र करून सप्टेंबरमध्ये १३ दिवस बॅंका बंद राहतील, असे संदेश व्हायरल झाले आहेत. या अफवा असून त्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी वगळता इतर कोणतीही अतिरिक्त सुट्टी नाही.बॅंक कर्मचाऱ्यांच्या मागण्या...बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संपाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये ८ मार्च २०२४ रोजी झालेल्या समझोता करारानुसार पाच दिवसांचा आठवडा त्वरित लागू करावा, शासनाने एकतर्फी व भेदभावपूर्ण पद्धतीने लागू केलेली ‘कामगिरी आधारित प्रोत्साहन’ योजना तत्काळ मागे घेऊन तिच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, कामगार संघटनांशी द्विपक्षीय चर्चा करून या योजनेत आवश्यक सुधारणा करून तसेच वेतन करार व सेवेसंदर्भातील इतर उर्वरित प्रश्न तातडीने निकाली काढाव्यात, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
ጤናከፍተኛ መካከለኛPMC News: राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप अन् कर्मचाऱ्यांची दांडी; बदली रोखण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांकडे धाव घेत कर्मचाऱ्यांचे जुन्याच जागेवर ठाण.
የዕለት ተዕለት ሕይወትብቃትपुण्याच्या डेक्कन भागातल्या गुडलक चौकात रविवारी पुणेकर एकत्र आले. हा केवळ काही नागरिकांचा मोर्चा नव्हता, तर तो गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील सांस्कृतिक सणांच्या (DJ Banned) नावाखाली चालू असलेल्या आवाजाच्या जाचाविरोधात उमटलेला एक प्रातिनिधिक एल्गार होता.
नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे घर बदलल्यानंतर विविध सरकारी आणि बँकिंग कामांसाठी आधार कार्डवरील पत्ता अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेकदा नागरिक पत्ता बदलण्यासाठी आधार केंद्रावर तासंतास रांगेत उभे राहतात. मात्र, आता UIDAI च्या अधिकृत पोर्टलवरून अवघ्या काही मिनिटांत ऑनलाईन पत्ता बदलणे अगदी सोपे झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया.
ጉዞየመጀመሪያ ደረጃMedha Kulkarni: पुण्याने महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श 'पुणे पॅटर्न' तयार करावा; खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे डीजे व लेझर लाईटविरोधात रोखठोक वक्तव्य.