Stredne pokročilý je samostatná fáza: dokážeš sledovať hlavné body skutočných textov v jazyku maráthčina o známych témach. Tieto lekcie používajú dlhšie texty a prirodzené formulácie, takže sa stretneš s jazykom tak, ako ho ľudia naozaj používajú.
Na dosiahnutie tejto úrovne je potrebných asi 2 000 slov a približne 350–400 hodín štúdia.
Veda a technikaStredne pokročilýPMC Waste Management: दररोज ७५ मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प; सण-उत्सवांच्या काळात रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या सुक्या कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार.
ŠportStredne pokročilýईश्वरपूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ओढणीने गळा आवळून निर्घृण खून केल्यानंतर तिचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मंगेश चंद्रकांत कांबळे (रा. मांगले, ता. शिराळा) असे शिक्षापात्र आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. १) देविदास एच. केळूसकर यांनी हा निकाल दिला. या खटल्यात अवघ्या सहा वर्षांच्या मुलाने स्वतःच्या बापाविरोधात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, मंगेश याने प्रेमविवाह केला होता. तो पनवेल येथे डंपरचालक म्हणून कामाला असताना पत्नी प्राजक्ता (वय ३०), मुलगा शिवम (वय ६) आणि मुलगी शिवण्या (वय ३) यांच्यासह राहत होता. मंगेश पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत भांडत असे. २१ मार्च २०२५ रोजी तो कुटुंबासह मांगले येथील मूळ गावी आला. त्यानंतर २७ मार्च २०२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरी त्याने पुन्हा प्राजक्ताशी वाद घातला. मारहाण करत ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.मुलासमोरच मृतदेह पेटीत ठेवलाखुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मंगेशने मृतदेह शेजारच्या खोलीतील लोखंडी पेटीत ठेवला आणि खोलीला कुलूप लावून पसार झाला. हा सर्व प्रकार सहा वर्षांचा मुलगा शिवम प्रत्यक्ष पाहत होता. शिवमने रडत आत्याला सर्व प्रकार सांगितल्यानंतर हत्येचा बनाव उघडकीस आला. मृत प्राजक्ता यांच्या आई रंजना चांदणे यांनी शिराळा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती.शिराळा पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी रंजना चांदणे, मुलगा शिवम, पंच, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक बनसोडे, डॉ. अनिरूद्ध काकडे, तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.बालविकास अधिकारी स्वाती शिंदे, मावशी वर्षा चांदणे व पोलिसांच्या उपस्थितीत शिवमचा जबाब नोंदवण्यात आला होता. "वडिलांनी आईला मारहाण करून गळा आवळला अन् कपड्याने बांधून मोठ्या डब्यात ठेवले", अशी साक्ष चिमुकल्या शिवमने न्यायालयात दिली. या बालकाची महत्त्वपूर्ण साक्ष या खटल्याचा मुख्य आधार ठरली.न्यायालयाने भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) व २३८ अन्वये मंगेशला दोषी धरत जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. सतीश केकणीस यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शरद जाधव, सुनंदा निकम व पोलिस हवालदार उत्तम शिंदे यांनी सहकार्य केले.
SpoločnosťStredne pokročilýसोलापूर : कॉरिडॉरसाठी पंढरपूर येथे बाधित दुकानदारांना पर्यायी दुकान, बाधित होणाऱ्या ४५० हून अधिक घरांतील नागरिकांना योग्य पर्याय उपलब्ध करून देत नियोजन केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर निवासी संकुल उभे केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. बाधितांसाठी मंदिरापासून सव्वा किलोमीटर अंतरावर एकतीस हजार तीनशे चौरस मीटर इतकी जागा असून, यात २८ हजार चौरस मीटर जागेवर घरे बांधून दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे बाधितांना घर आणि दुकान बांधून पूर्ण होईपर्यंत तीन वर्षे घर आणि दुकानाचे भाडेदेखील राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. त्यासाठी विशेष पुनर्वसन पॅकेजला मान्यता दिल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.पंढरपूरमधील जमीन व मालमत्ता अधिग्रहणासाठी देण्यात येणारा मोबदला हा थेट मुंबईतील दरांच्या धर्तीवर देण्यात आला आहे. पंढरपूरमधील जुनी मंदिरे आणि मठ यांचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवून त्यांचा विकास केला जाणार आहे. कोणतेही मंदिर किंवा मठ स्थलांतरित केले जाणार नाहीत. बाधितांचे योग्य पुनर्वसन करून जागेस जागा देण्याचे शासनाचे धोरण आहे. विकास आराखड्यामुळे बाधित होणारे दुकानदार, रहिवासी आणि इतर व्यावसायिक यांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
Zábava
रोहन आणि स्नेहा संगीत महोत्सवांमधील त्यांच्या अनुभवांबद्दल बोलतात. ते थेट संगीताचा उत्साह आणि घरी ऐकण्याचा सोयीस्करपणा यांची तुलना करतात, तसेच महोत्सव इतके खास का असतात यावर चर्चा करतात.
Zábava
रोहन आणि स्नेहा व्हिडिओ गेम्सना एक गंभीर कला मानावे की नाही यावर चर्चा करतात. ते आधुनिक गेम्समधील कथाकथन, संगीत आणि दृश्य रचनेचा विचार करतात.
Fantázia
रोहन आणि स्नेहा चर्चा करतात की रिअर्डनच्या पर्सी जॅक्सन मालिकेमुळे प्राचीन पुराणकथांना कसा नवा जीव मिळाला, आणि जुने देव व राक्षस आजच्या तरुण वाचकांना का भावतात.
Stredne pokročilý11:47Sukirtg
Stredne pokročilý10:02JeevanKadamVlogs
Stredne pokročilý24:49Rajshri Marathi
Urob si krátky zaraďovací test a navrhneme ti, kde začať.
Urobiť test úrovne