जास्वंदीच्या झाडाला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी हा उपाय नक्की करून पाहा
जास्वंदीचं झाड घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत लावलं की त्यावर लाल, गुलाबी, पिवळी किंवा इतर रंगांची सुंदर फुलं उमलताना पाहण्याचा आनंद काही औरच असतो. विशेषतः गणपती बाप्पाच्या आगमनाच्या काळात घरच्या जास्वंदीला भरपूर फुलं यावीत, अशी अनेकांची इच्छा असते. पूजेसाठी जास्वंदीची फुलं वापरली जात असल्यामुळे घरच्या झाडाला भरभरून फुलं आली तर त्याचा आनंद आणखी वाढतो.जास्वंदीचं झाड निरोगी असूनही त्याला फुलं कमी येत असतील, तर झाडाला योग्य पोषण मिळतंय का, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही साध्या गोष्टींचा वापर करून द्रवरूप खत तयार करता येतं. या उपायामुळे झाडाला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होऊ शकते. SP GARDENING MARATHI या YouTube व्हिडिओमध्ये दिली आहे. (फोटो सौजन्य :- @SP GARDENING MARATHI)