Tasolla yläkeskitaso luet ja kuuntelet kieltä marathi sujuvasti monista aiheista. Näillä oppitunneilla on uutisia, mielipiteitä ja pidempiä tarinoita, ja sanasto auttaa seuraamaan perusteluja ja ilmaisemaan omia näkemyksiä.
Noin 4 000 sanaa ja suunnilleen 500–600 tuntia opiskelua tämän tason saavuttamiseen.
Täysi-ikäistyminenYläkeskitasoOBC Morcha : अंतरवली सराटीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु असतानाच आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा धडकणार आहे.
Täysi-ikäistyminenYläkeskitasoसांगली : कामात अनियमितता, हलगर्जीपणा, विनापरवाना गैरहजेरी, आर्थिक गैरव्यवहार यांसह विविध कारणांमुळे जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायत अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. संबंधित प्रकरणांचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे चौकशीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, यातील काही प्रकरणे तब्बल आठ ते नऊ वर्षांपासून प्रलंबित असल्याने चौकशीचा अहवाल आणि त्यानंतर होणारी कारवाई नेमकी कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणांकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष घालून चौकशीला गतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.ग्रामपंचायत अधिकारी हा गावच्या प्रशासकीय यंत्रणेतील महत्त्वाचा घटक आहे. गावातील विकास कामांचे नियोजन, ग्रामपंचायतीच्या निधीचा विनियोग, ग्रामसभा, ठरावांची अंमलबजावणी, विविध अहवाल व पत्रव्यवहार, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर असते. पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी, स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, १५ वा वित्त आयोग, प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट गाव यांसह विविध योजनांचे कामकाजही त्यांना पाहावे लागते.गावाच्या विकासासाठी काही ग्रामपंचायत अधिकारी जबाबदारीने आणि सक्रियपणे काम करत असताना काही ठिकाणी त्यांच्या कामकाजाबाबत तक्रारींचा पाढा वाढत असल्याचे चित्र आहे. आर्थिक गैरव्यवहार, कामात अनियमितता, कर्तव्यात कसूर, विनापरवाना गैरहजेरी यांसारख्या कारणांमुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार ४९ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या चौकशीचे प्रस्ताव विभागीय स्तरावर पाठविण्यात आले आहेत.२०१७ पासूनची प्रकरणे अजूनही प्रलंबितविशेष म्हणजे काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध २०१७ पासूनच विभागीय चौकशीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. आठ ते नऊ वर्षांचा कालावधी उलटूनही या प्रकरणांतील चौकशी अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झालेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणांमध्ये चौकशीची प्रक्रिया नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशीचा प्रस्ताव पाठविला, त्यानंतर अहवालाची प्रतीक्षा आणि अहवाल आल्यानंतर कारवाई, या प्रक्रियेला वर्षानुवर्षे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. दोषी असल्यास कारवाई आणि निर्दोष असल्यास संबंधितांना दिलासा, यापैकी कोणताही निर्णय वेळेत होत नसल्याने प्रकरणे प्रलंबित ठेवण्याचा नेमका फायदा काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.'तारीख पे तारीख'चा कारभार कधी थांबणार?ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी आल्यानंतर चौकशीचा प्रस्ताव पाठविणे ही केवळ प्रक्रियेची सुरुवात आहे. त्यानंतर चौकशी पूर्ण होऊन अहवाल प्राप्त होणे आणि त्यावर अंतिम निर्णय होणे आवश्यक आहे. मात्र, अनेक प्रकरणांत प्रस्ताव पाठवून वर्षानुवर्षे उलटूनही अहवालच प्राप्त होत नसल्याने 'चौकशी पूर्ण होणार कधी आणि कारवाई होणार कधी?' असा सवाल आता उपस्थित होत आहे.
TerveysYläkeskitasoसोलापूर : बेरोजगारी, अस्थिर खासगी नोकऱ्या आणि मुलींच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे तरुणांचे लग्न जुळत नाही. त्यातच विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली मॅरेज ब्युरो आणि खासगी व्यक्तींकडून प्रचंड लूट होत आहे. याविरोधात लग्नाळू तरुण १० सप्टेंबरला सोलापुरात जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर शांततेत बसून सरकारचे लक्ष वेधणार आहेत. लग्न योग्य वयात व्हावे, फसवणूक होऊ नये यासाठी शासनाकडे अविवाहित तरुण-तरुणींची अधिकृत नोंद असणे आवश्यक असल्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.आम्ही लग्नाळू युवक येतोय सोलापूर जिल्हा परिषद समोर.. लग्नाळू तरुणांनो, शांततापूर्ण निषेधासाठी एकत्र या... अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आंदोलनाचे प्रमुख किसनदेव ननवरे यांनी सांगितले की, मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सरकारी अथवा स्थिर नोकरी असलेला वर हवा, अशी अपेक्षा केली जात असल्याने बेरोजगार तसेच खासगी नोकरी करणाऱ्या तरुणांना विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे लग्न न होण्याच्या समस्येची नेमकी व्याप्ती समोर आणण्यासाठी शासनाकडे अविवाहित तरुण-तरुणींची अधिकृत नोंद असणे आवश्यक असल्याची मागणी ननवरे यांनी केली. विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली मॅरेज ब्युरो आणि खासगी व्यक्तींकडून अविवाहित तरुणांच्या कुटुंबीयांकडून प्रचंड पैसे उकळत आहेत. याविषयी मागण्यांचे निवेदन पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे यांना देेणार आहेत.आंदोलनकर्त्यांच्या मागण्याजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सर्व धर्मीय अविवाहित तरुण-तरुणींची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुरू करावीसरकारी विवाह नोंदणी पोर्टल निर्माण करावेविवाह इच्छुक तरुणांना पाच लाखांचे पॅकेज द्यावे
Viihde
रोहन आणि स्नेहा यांमध्ये पुस्तकांवर आधारित चित्रपट किंवा वेब सीरिज मूळ कथेइतक्या चांगल्या असू शकतात का, यावर चर्चा होते. या प्रक्रियेत काय गमावले जाते आणि काय मिळवले जाते, याचे उदाहरणे ते देतात.
Viihde
रोहन आणि स्नेहा चर्चा करतात की स्ट्रीमिंग सेवांनी आपली टीव्ही पाहण्याची पद्धत कशी बदलली आहे, आणि एकाच बैठकीत पूर्ण सीझन पाहण्याचे फायदे व तोटे काय आहेत.
Liiketoiminta ja ura
रोहनची जुनी मैत्रीण कावेरी हिने पंधरा वर्षांचे लेखापालाचे करिअर सोडून चाळीशीत नर्सिंगमध्ये प्रवेश घेतला. रोहन आणि स्नेहा या बदलासाठी काय लागते आणि वयाच्या कोणत्याही टप्प्यावर दिशा बदलणे का कधीच उशिरा होत नाही, यावर बोलतात.
Yläkeskitaso5:22Rajshri Marathi
Yläkeskitaso3:14Rajshri Marathi
Yläkeskitaso21:29Sukirtg
Tee lyhyt sijoitustesti, niin ehdotamme, mistä aloittaa.
Tee tasotesti