Hop til indhold
Mesterskab

Marathi: Mesterskab-niveau

Mesterskab er mestring af marathi: Du forstår næsten alt og fornemmer nuancer, humor og stilleje. Disse lektioner bruger rige, idiomatiske tekster til at skærpe sprogets fineste detaljer.

Det kan du på mesterskab

  • Forstå stort set alt, hvad du læser eller hører.
  • Sammenfatte information fra forskellige kilder.
  • Udtrykke fine betydningsnuancer præcist.

Cirka 16.000 ord og omkring 1.000–1.200 timers læring for at nå dette niveau.

Lektioner på marathi til mesterskab

Nyheder

Se alle 9
Inspiration & humorMesterskab
Pudhari1. sep.

Ratnagiri News : चिपळूण न. प.च्या रस्ता रुंदीकरणासाठी हालचाली सुरू

चिपळूण शहर : शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख व छत्रपती शिवाजी चौक ते पाग पॉवर हाऊस (स्वा. सावरकर चौक) रस्ता रूंदीकरणाच्या प्रक्रियेला चिपळूण न.प. प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार २ सप्टेंबरपासून प्रस्तावित रूंदीकरणामध्ये ताब्यात घेतल्या जाणार्‍या जागांचे मोजमाप व मूल्यमापन प्रशासनाकडून सुरू केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यासंदर्भात संबंधित जागा मालकांना यापूर्वीच नोटीसांद्वारे सूचीत करण्यात आले आहे.शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांचे रूंदीकरण करण्याबाबत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी निर्णय घेतला. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने प्रामुख्याने शहरातील रस्ते रूंद असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी प्रथम प्रमुख वर्दळीचे रस्ते रूंद करण्यासाठी प्रशासनाकडून परिपूर्ण माहिती व तांत्रिक अहवाल नियोजन तयार करून घेतले. त्यानुसार आवश्यक असणार्‍या निधीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या महत्त्वाच्या विकासकामांचे प्रस्ताव निधीसाठी दिले. त्याला प्राथमिक स्तरावर संबंधितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली जाणार आहे.यापूर्वी प्राथमिक स्तरावर रस्ता रूंदीकरणाची मोजमापे घेण्यात आली. त्यानुसार दोनवेळा संबंधित जागा मालकांना या बाबत नोटीसा देऊन कल्पना देण्यात आली व बाधीत जागेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच संबंधितांनी रस्ता रूंदीकरणासंदर्भात प्रशासन व न.प.कडून कोणत्या अपेक्षा आहेत, अशा आशयाच्या सूचना मागविण्यात आल्या. आता प्रशासनाकडून रूंदीकरणासाठी कार्यवाहीचे पहिले पाऊल उचलले जाणार आहे. त्यानुसार प्रशासनाने छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख नाका दरम्यानच्या रस्ता रूंदीकरणाला दोन्ही बाजूने आवश्यक जागा रेखांकीत करण्यासाठी संबंधित जागांचे मोजमाप व रेखांकन करण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्याबाबत संबंधित जागा मालकांना प्रशासनाकडून नोटीसा देऊन सूचीत करण्यात आले आहे.

SamfundMesterskab
Pudhari1. sep.

Hirkani Tigress : ‘हिरकणी’ही पडली कोकणच्या प्रेमात

चिपळूण : कोयना अभयारण्यात सोडलेल्या वाघांना कोकणातील निसर्गाची भुरळ पडली आहे. या अभयारण्यात सोडलेली ‘हिरकणी’ तब्बल दोन महिने कोकणातील चिपळूण परिसरात वास्तव्यास होती. अनेकवेळा वन विभागाने तिला पुन्हा कोयना अभयारण्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. अखेर दोन महिन्यांनंतर ती पुन्हा एकदा आपल्या कोयना अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात स्थिरावली. त्यासाठी तिला खास प्रयत्न करून वळवावे लागले. त्यामुळे वाघांना कोकणचा निसर्ग आवडल्याचे अधोरेखित झाले आहे.११६५ चौ.कि.मी. परिसरातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पसरला आहे. सह्यद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येतो. त्यामुळे अनेकवेळा व्याघ्र प्रकल्पातील वाघ कोकणामध्ये येत असतात. आंबा घाटमार्गे, तर कधी कुंभार्ली घाटमार्गे त्यांचा कोकणामध्ये प्रवास घडतो. यावेळी तिने याच भागात शिकार केल्याचेही सांगण्यात येत आहे.कोयना अभयारण्यात सोडलेला नर वाघ ‘एसटीआर 03’ अर्थात बाजी याच्या जोडीला ही ‘हिरकणी’देखील कोयना अभयारण्यात सोडण्यात आली. यानंतर या वाघिणीने कोयना अभयारण्यात आपला वावर सुरू केला आणि कालांतराने ही वाघीण पश्चिमेकडे अर्थात सह्याद्री पर्वत ओलांडून थेट कोकणात आली. कोकणात प्रवेश पेंच व्याघ्र प्रकल्पातून पीटीआर १२३ या क्रमांकाची वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आली. तिला ‘एसटीआर ०६’ हा शासकीय नंबर देण्यात आला, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्‍यांनी तिला ‘हिरकणी’ हे नाव दिले. तिने नावाप्रमाणेच सह्याद्रीचा कडा ओलांडून कोकणात प्रवेश केला. तब्बल दोन महिने ती चिपळूण तालुक्याचा पूर्व विभाग पादाक्रांत केला.

HverdagenMesterskab
Dainik Prabhat1. sep.

अग्रलेख : उत्सवाचे मांगल्य

पुण्याच्या डेक्कन भागातल्या गुडलक चौकात रविवारी पुणेकर एकत्र आले. हा केवळ काही नागरिकांचा मोर्चा नव्हता, तर तो गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील सांस्कृतिक सणांच्या (DJ Banned) नावाखाली चालू असलेल्या आवाजाच्या जाचाविरोधात उमटलेला एक प्रातिनिधिक एल्गार होता.

Podcasts

Se alle 10
Mesterskab25:31

Opvækst

स्वतंत्रपणे जगायला शिकणे

रोहन आणि स्नेहा खऱ्या स्वतंत्रतेच्या शांत, अग्लॅमरस कामाचे विश्लेषण करतात. केवळ एकटे राहणे आणि प्रत्यक्षात स्वतंत्रपणे जगणे यातील फरक ते स्पष्ट करतात. स्वयंपाक, आर्थिक व्यवस्थापन आणि सामाजिक जीवनात घाबरून प्रतिक्रिया देण्यापासून ते सक्षमपणे नियोजन करण्यापर्यंतच्या त्यांच्या स्वतःच्या हळूहळू झालेल्या बदलांचा ते आढावा घेतात.

रोहन देशमुख & स्नेहा जोशीLyt og lær
Mesterskab22:37

Fantasy

कल्पनारम्य कथा कुठे संपतात आणि लोकश्रद्धा कुठे सुरू होते

रोहन आणि स्नेहा शोध घेतात की रचलेल्या कल्पनारम्य कथा आणि जिवंत लोकश्रद्धा यांमधील अस्पष्ट सीमा कशी ओळखावी. श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि सांस्कृतिक अधिकार हे कसे ठरवतात की देवता व आत्म्यांबद्दलची एक कथा मिथक आहे, धर्म आहे की केवळ मनोरंजन.

रोहन देशमुख & स्नेहा जोशीLyt og lær
Mesterskab25:51

Erhverv & karriere

शांत राजीनामा आणि महत्त्वाकांक्षेचा अंत

रोहन आणि स्नेहा 'शांत राजीनामा' या घटनेचे विश्लेषण करतात. ही महत्त्वाकांक्षेची निरोगी पुनर्मांडणी आहे की आधुनिक कामाच्या संस्कृतीतील एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण, यावर ते सखोल चर्चा करतात.

रोहन देशमुख & स्नेहा जोशीLyt og lær

Marathi mesterskab efter emne

Andre niveauer i marathi

Usikker på, om det er dit niveau?

Tag den korte placeringstest, så foreslår vi, hvor du skal starte.

Tag niveautesten

Spørgsmål om marathi på mesterskab

Hvad er Mesterskab-niveauet i marathi?
På Antlang er Mesterskab et af seks niveauer, der beskriver, hvor godt du klarer marathi. Nuance og stil.
Hvor mange ord på marathi skal jeg bruge til mesterskab?
Omkring 16.000 ord er et godt mål for mesterskab. Tallet afhænger af sproget og af, hvilke ord du vælger. Lær de hyppigste først.
Hvor lang tid tager det at nå marathi mesterskab?
Omkring 1.000–1.200 timers læring i alt, for en engelsktalende, der lærer et sprog af gennemsnitlig sværhedsgrad. Korte daglige sessioner med indhold på dit niveau virker bedre end sjældne lange.